Posts

ईकीगाई

ईकीगाई म्हणजे काय?ईकीगाई ही जापनीज टेक्निकन आहे.जे काम आपल्या स्वतःला आवडते,त्याची लोकांना गरज आहे व त्यातून आपला उदरनिर्वाह होऊ शकतो यालाच ईकीगाई म्हणतात.                                                                 आपल्याला स्वतःला जे काम आवडत नाही.ते करत असताना एक प्रकारचा तणाव निर्माण होतो.सतत तणाव आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतो.त्यामुळेच स्मरणशक्तीच संबंधित असणाऱ्या मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो.तसेच निराशा येऊ नये यासाठी ज्या प्रकारच्या हार्मोन्सची आवश्यकता असते त्याची निर्मिती थांबते.याचे शरीरावर होणारे इतर परिणाम म्हणजे चिडचिडेपणा,निद्रानाश, चिंता आणि उच्च रक्तदाब.तणाव टाळण्यासाठी समस्या येण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात.                 त्यावर एक चांगला उपाय म्हणजे जागरूकतेंने जगणे.जागरूकतेच्या अवस्थेतपर्यत पोहचण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान.ध्यानामुळे बाहेरील ज...

ज्ञान एक उपयुक्त हत्यार आहे

मी सद्धा 'लिमिटलेस'नावाचे एक पुस्तक वाचत आहे.त्यातील एक प्रसंग सांगत आहे.एका पाॅवरप्लांटमध्ये एक दिवस अचानक सारं काही ठप्प होत. सर्व यंत्र बंद पडतात. सगळीकडेच शांतता पसरते.बरेच प्रयत्न करूनही समस्या सापडत नाही.अशा परिस्थितीत एक अधिकारी दुरुस्ती करण्यात सर्वोत्तम समजल्या जाणार्‍या स्थानिक तंत्रज्ञाला बोलावतो.तो तंत्रज्ञ ठरल्याप्रमाणे येतो.सगळीकडे फिरून तंत्रज्ञ अंदाज घेतो.तिथे एका बाजूला भरपूर इलेक्ट्रिक मीटर्स असतात. त्यापैकी एक उघडून आतल्या वेगवेगळ्या वायरी आणि स्क्रू फिरवतो.सर्व यंत्र सुरू होतात आणि तो प्लांट पुन्हा सजीव होतो.हे सर्व पाहून तो अधिकारी फार सुखावतो.त्या तंत्रज्ञाचे आभार मानून पैसे किती द्यायचे विचारतो.तंत्रज्ञ म्हणतो,"१००००$"हे ऐकून अधिकाऱ्याला धक्काच बसतो.अधिकारी म्हणतो,'काही मिनिटांसाठी इथे आला,एक स्क्रू फिरवलास. एवढे पैसे सांगत आहे.कृपया व्यवस्थित बील दे.                    हे ऐकताच तो तंत्रज्ञ खिशातून एक नोटपॅड काढतो आणि त्याच्यावर काहीतरी खरडून ते बील अधिकाऱ्याच्या हातावर ठेवतो.अधिकारी ते बील वाचून लगेचच त्याला पैसे ...

पुस्तक आणि आपण

 पुस्तकाशी मैत्री म्हणजे सुवर्ण योगच म्हणाव लागेल.पुस्तक आपल्याला वेगळया दुनियेत घेऊन जातात.आपल मन खूप हलकं होतं.पुस्तक न बोलता आपल्याला समजून घेतात.खरचं हे शक्य आहे का?न बोलता आपलं मन जाणणं किती अवघड आहे पण पुस्तक हे करु शकतात.पुस्तकांशीमैत्री म्हणजे पूर्ण जगाशी मैत्री.पुस्तक आपल्याला आख्या जगात फिरुन आणू शकतात.नवनवीन माहिती आपल्याला पुस्तकामुळेच समजते.जो पुस्तकाशी मैत्री करेल तो जीवनात कधीही दु:की राहू शकत नाही.

आई आणि मुलगी

आई आणि मुलींचे नातं वेगळेच असते. मुलीच्या आवाजावरून आईला समजते की मुलीला कशाची गरज आहे. त्यामुळे दोघींचे नाते घट्ट होत जाते.मुलगी नेहमी आईचीच बाजू घेते.आई मनातून खूप सुखावते.आई पण मुलीला काही कमी पडू देत नाही.तिचा सर्व हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करते.हळूहळू हे दृश्य बदलते.जसजसे आईचे वय वाढते मग मुलगी आई बनते.ती आईचे हट्ट पुरवणारा सुरुवात करते.त्यावेळी आईचे डोळे पाणावतात.हिच का माझं बाळुत्यातील बाळ. खरंच किती मोठी झाली आणि आईचे जीवन कृतकृत्य होते.

ए. पी.जे.अब्दुल कलाम

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सगळे पुस्तक वाचनीय व प्रेरणा देणारे लिहिलेले आहे.त्याचे 'अग्नीपंख'हे पुस्तक तरुण मुला_मुलीसाठी खूपच ऊर्जा देणारे आहे.मला तर असे वाटते की सर्व जण  हे पुस्तक वाचावे.त्यातील एक वाक्य खूपच सुंदर लिहिलंय आहे.' कधीही कामाला आपल्या पेक्षा मोठे होऊ द्यायचे नाही.' असे वाक्य आपल्या जीवनात आचरणात आणल्यास खरंच सकारात्मक ऊर्जा मिळते. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जीवन सोपे वाटायला लागते. त्यावेळेस समजते की शब्दांमध्ये किती ताकद आहे.आपण स्वत़ आतून कणखर होत जातो.अशा वेळी कोणाकडून ही जास्त अपेक्षा करायची इच्छा होत नाही.त्यामुळे अपेक्षा भंग पण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले मन निर्मळ होते.आपण आऩंदी जीवन जगण्याला सुरुवात करतो.