पुस्तक आणि आपण

 पुस्तकाशी मैत्री म्हणजे सुवर्ण योगच म्हणाव लागेल.पुस्तक आपल्याला वेगळया दुनियेत घेऊन जातात.आपल मन खूप हलकं होतं.पुस्तक न बोलता आपल्याला समजून घेतात.खरचं हे शक्य आहे का?न बोलता आपलं मन जाणणं किती अवघड आहे पण पुस्तक हे करु शकतात.पुस्तकांशीमैत्री म्हणजे पूर्ण जगाशी मैत्री.पुस्तक आपल्याला आख्या जगात फिरुन आणू शकतात.नवनवीन माहिती आपल्याला पुस्तकामुळेच समजते.जो पुस्तकाशी मैत्री करेल तो जीवनात कधीही दु:की राहू शकत नाही.



Comments