ईकीगाई
ईकीगाई म्हणजे काय?ईकीगाई ही जापनीज टेक्निकन आहे.जे काम आपल्या स्वतःला आवडते,त्याची लोकांना गरज आहे व त्यातून आपला उदरनिर्वाह होऊ शकतो यालाच ईकीगाई म्हणतात. आपल्याला स्वतःला जे काम आवडत नाही.ते करत असताना एक प्रकारचा तणाव निर्माण होतो.सतत तणाव आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतो.त्यामुळेच स्मरणशक्तीच संबंधित असणाऱ्या मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो.तसेच निराशा येऊ नये यासाठी ज्या प्रकारच्या हार्मोन्सची आवश्यकता असते त्याची निर्मिती थांबते.याचे शरीरावर होणारे इतर परिणाम म्हणजे चिडचिडेपणा,निद्रानाश, चिंता आणि उच्च रक्तदाब.तणाव टाळण्यासाठी समस्या येण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात.
त्यावर एक चांगला उपाय म्हणजे जागरूकतेंने जगणे.जागरूकतेच्या अवस्थेतपर्यत पोहचण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान.ध्यानामुळे बाहेरील जगातून आपल्यापर्यंत पोहचणारी माहितीचा चाचणी लावून योग्य माहिती आपल्या मनामध्ये पाठविता येते.तसेच प्राणायाम व योगा यामुळे पण हे साध्य करता येते.असे भरपूर उपाय आहेत. ईकीगाई हे पुस्तक खूपच छान आहे.प्रत्येकानेच वाचून या गोष्टीं अंमलात आणल्या तर जीवन जगायला सोपे व आनंदमय होईल. मग वाचणार ना पुस्तक.
Comments
Post a Comment