ज्ञान एक उपयुक्त हत्यार आहे

मी सद्धा 'लिमिटलेस'नावाचे एक पुस्तक वाचत आहे.त्यातील एक प्रसंग सांगत आहे.एका पाॅवरप्लांटमध्ये एक दिवस अचानक सारं काही ठप्प होत. सर्व यंत्र बंद पडतात. सगळीकडेच शांतता पसरते.बरेच प्रयत्न करूनही समस्या सापडत नाही.अशा परिस्थितीत एक अधिकारी दुरुस्ती करण्यात सर्वोत्तम समजल्या जाणार्‍या स्थानिक तंत्रज्ञाला बोलावतो.तो तंत्रज्ञ ठरल्याप्रमाणे येतो.सगळीकडे फिरून तंत्रज्ञ अंदाज घेतो.तिथे एका बाजूला भरपूर इलेक्ट्रिक मीटर्स असतात. त्यापैकी एक उघडून आतल्या वेगवेगळ्या वायरी आणि स्क्रू फिरवतो.सर्व यंत्र सुरू होतात आणि तो प्लांट पुन्हा सजीव होतो.हे सर्व पाहून तो अधिकारी फार सुखावतो.त्या तंत्रज्ञाचे आभार मानून पैसे किती द्यायचे विचारतो.तंत्रज्ञ म्हणतो,"१००००$"हे ऐकून अधिकाऱ्याला धक्काच बसतो.अधिकारी म्हणतो,'काही मिनिटांसाठी इथे आला,एक स्क्रू फिरवलास. एवढे पैसे सांगत आहे.कृपया व्यवस्थित बील दे.
                   हे ऐकताच तो तंत्रज्ञ खिशातून एक नोटपॅड काढतो आणि त्याच्यावर काहीतरी खरडून ते बील अधिकाऱ्याच्या हातावर ठेवतो.अधिकारी ते बील वाचून लगेचच त्याला पैसे देतो.त्या बिलावर लिहिलेल असत,'स्क्रू फिरवणं आकारणी-'१$',कोणता स्क्रू फिरवायचा हे माहीत असणं-'९,९९९$'.

Comments