आई आणि मुलगी

आई आणि मुलींचे नातं वेगळेच असते. मुलीच्या आवाजावरून आईला समजते की मुलीला कशाची गरज आहे. त्यामुळे दोघींचे नाते घट्ट होत जाते.मुलगी नेहमी आईचीच बाजू घेते.आई मनातून खूप सुखावते.आई पण मुलीला काही कमी पडू देत नाही.तिचा सर्व हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करते.हळूहळू हे दृश्य बदलते.जसजसे आईचे वय वाढते मग मुलगी आई बनते.ती आईचे हट्ट पुरवणारा सुरुवात करते.त्यावेळी आईचे डोळे पाणावतात.हिच का माझं बाळुत्यातील बाळ. खरंच किती मोठी झाली आणि आईचे जीवन कृतकृत्य होते.

Comments

Post a Comment